शुक्रवार, १८ नोव्हेंबर, २०१६

वैश्विक ऊश्मिकरण !

*भक्तमंडळींसाठी विशेष सुचना* ( सर्व गोड गैरसमज दूर होण्यासाठी ) अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प भारतासाठी अतिघातक असलेल्या ग्लोबल वॉर्मिंगला नियंत्रणात आणण्याच्या भारतीय पंतप्रधानांच्या सर्व ईच्छा , स्वप्न मातीत मिळवणार ! आपल्या पंतप्रधानांनी विश्व आणि प्रामुख्याने भारताच्या दृष्टीने घातक असणार्या ग्लोबल वॉर्मिंगविरोधात खुपच स्तुत्य आणि ऐतिहासिक निर्णय घेतले होते. ज्यात "क्लिन एनर्जी" डिझेल किंवा कोळश्याऐवजी आपला देश प्रामुख्याने सौरऊर्जा , पवनऊर्जा , कचर्यापासून विजनिर्मिती ई. अनेक माध्यमांद्वारे प्रदुषणमुक्त ऊर्जेची ( विज ) निर्मिती करणार होता. ज्यामुळे ग्लोबल वॉर्मिंग कमी होण्यासाठी आपला देश खुप मोठे पाऊल ऊचलत होता. पण मित्रांनो अश्या प्रकारच्या निर्मितीचा सुरवातीचा अतिप्रचंड खर्च ऊचलणे भारताला शक्य नाहि. मित्रांनो ग्लोबल वॉर्मिंग हि कोण्या नेत्याची हवेतली घोषणा नाहि ते जमिनीवरील जळजळीत वास्तव आहे. ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे भीषण पुर , दुष्काळ , अतिशक्तीशाली वादळ , अवकाळी पाऊस , दिवसेंदिवस अधिक तप्त असह्य होत जाणारा ऊन्हाळा , आणि क्वचित अतिकडाक्याची थंडी अश्या एकामागुन एक धडकत रहाणार्या अस्मानी सुल्तानीचा कहर ! पण हा कहर जगातील सर्वात शक्तीशाली पदावर बसलेल्या डोनाल्ड ट्रम्प नावाच्या बिनडोक घातकी माणसामुळे आत्ता कयामत किंवा प्रलय बनु शकतो. कसे ते ऊद्यापासून कळेलच !